2 POSTS
विजय पांढरीपांडे हे औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात कुलगुरू होते. त्यांनी विद्यापीठाला नॅकमध्ये ‘अ’ मानांकनाचे उच्च शिखर गाठून दिले. त्यांनी नागपूर विद्यापीठातून इंजिनीयरिंगची पदवी, आयआयटी खरगपूर येथून इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशनमध्ये एम टेक व पी एचडी मिळवली. त्यांचे एकशे साठ शोधनिबंध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये प्रसिद्ध झाले आहेत. त्यांनी संरक्षण प्रयोगशाळेच्या निवड समित्यांवर तीन दशके काम केले आहे. त्यांना विविध पुरस्कारांनी गौरवले आहे. ते सध्या हैदराबाद येथे स्थायिक आहेत. त्यांची मराठी भाषेत तेहतीस पुस्तके प्रकाशित झाली आहेत. ते वृत्तपत्रांतून सामाजिक, शैक्षणिक विषयांवर प्रासंगिक लेखन करतात.