1 POSTS
विजय भटकर हे ‘परम संगणक’ तज्ज्ञ व शास्त्रज्ञ आहेत. भटकर यांनी संगणकावर मायबोलीत लिहिता यावे यासाठी जिस्ट (GIST) हे तंत्रज्ञान भारताला उपलब्ध करून दिले. भटकर यांनी इन्फर्मेशन व कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी सर्वत्र पोचावी म्हणून ‘एज्यकेशन टू होम’ (ETH) या संस्थेची स्थापना केली. त्यांनी त्रिवेंद्रममध्ये इलेक्ट्रॉनिक रिसर्च अँड डेव्हलपमेंट ही भारतातील सर्वात मोठी प्रयोगशाळा स्थापन केली. ते इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी या पदव्युत्तर शिक्षण संस्थेचे संस्थापक आहेत. त्यांना महाराष्ट्र भूषण, पद्मभूषण व पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.