1 POSTS
वि. ह. कुळकर्णी हे प्रख्यात समीक्षक, लेखक व वक्ता होते. ते मुंबईच्या माटुंगा येथील रामनारायण रुईया महाविद्यालयामध्ये इंग्रजीचे प्राध्यापक आणि विभागप्रमुख होते. त्यांनी विद्यापीठ रसायनशास्त्र विभाग (यु डी सी टी) आणि मुंबई विद्यापीठ येथेही शिकवले. त्यांनी ज्योत्स्ना, प्रतिभा, विविधवृत्त अशा नियतकालिकांतून खुसखुशीत लेखन केले. त्यांनी ‘अ. ब. कोल्हटकर : व्यक्ति आणि वाङ्मय’, ’जॉर्ज बर्नार्ड शॉ’, ‘ग. त्र्यं. माडखोलकर’ अशी काही पुस्तके लिहिली आहेत.