1 POSTS
वसंतराव जुगळे हे अर्थशास्त्र विषयाचे प्राध्यापक होते. ते सामाजिक विज्ञान विद्याशाखेचेही डीन होते. त्यांना अध्यापनाचा एकोणचाळीस वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी श्रीलंका, बांगलादेश, अमेरिका, मलेशिया आणि घाना या देशांना शैक्षणिक आणि संशोधनाच्या निमित्ताने भेट दिली आहे. त्यांना अर्थशास्त्रातील कार्याबद्दल राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. त्यांनी संशोधन संदर्भात अठरा पुस्तके लिहिली आहेत. त्यांचे शंभरहून अधिक शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली तीस पीएच डी व चाळीस एम फिल च्या विद्यार्थ्यांनी त्यांचे प्रबंध सादर केले आहेत.