Home Authors Posts by वैशाली रोडे

वैशाली रोडे

1 POSTS 0 COMMENTS
वैशाली रोडे पत्रकार आणि लेखक आहेत. त्या ‘महानगर‘ आणि ‘सकाळ‘ या दैनिकांत सव्वीस वर्षें पत्रकारिता करत होत्या. त्यांनी समाज, साहित्य, स्त्रिया या विषयांवर आधारित पुरवण्या, दिवाळी अंक यांचे संपादन केले आहे. त्या सध्या ‘मुक्त पत्रकार’ म्हणून काम करतात. त्यांनी ‘मी हिजडा मी लक्ष्मी’ या लक्ष्मी नारायण त्रिपाठी या हिजडा कार्यकर्त्याच्या आत्मचरित्राचे शब्दांकन केले आहे. त्या पुस्तकाच्या सहा आवृत्त्या प्रसिद्ध झाल्या आहेत. ते इंग्रजी, हिंदी, गुजरातीत अनुवादित झाले आहे. त्यांनी अभिनेते ए.के. हंगल यांच्या इंग्रजी आत्मचरित्राचा मराठी अनुवाद केला आहे.9870108450

हिजड्यांच्या टाळीला समाजाची हाळी! (Transgender Community and Social Reaction)

मुलं पहिली-दुसरीच्या वर्गात अक्षरओळख शिकत असताना ‘छ’ अक्षर आलं की दोन शब्द हमखास सांगतात ‘छत्री’ आणि ‘छक्का’. छक्का म्हणत असताना मुलांच्या चेहऱ्यावर उमटलेल्या चोरट्या हसण्यात त्यांचा ‘छक्का’ या शब्दाबद्दलचा, तो शब्द धारण करणाऱ्या व्यक्तींबद्दलचा भाव लपलेला असतो.