राजेंद्र गाडगीळ
जनआरोग्य योद्धा – डॉ.अनंत फडके
पुण्याचे डॉ.अनंत फडके म्हणजे एके काळच्या मागोवा गटात सहभाग असलेला, शहादा श्रमिक-संघटनेच्या चळवळीचा पाठीराखा. त्यांनी लोकविज्ञान चळवळ, जनआरोग्य चळवळ यांच्यासाठी आरोग्य व आरोग्य-सेवेसंदर्भात आमूलाग्र सुधारणा करण्याकरता शास्त्रीय भूमिका मांडली. त्यांनी 15 एप्रिल 2025 रोजी वयाच्या पंच्याहत्तरीत पदार्पण केले. सारे जग पैशांच्या मागे धावत असताना डॉ. फडके यांनी स्वत:ला ‘जनआरोग्य चळवळी’त झोकून दिले आहे. त्यांनी वैद्यकीय व्यवसाय केला नाही. ते ज्या निष्ठेने प्रस्थापित वैद्यकीय क्षेत्रातील अपप्रवृत्तींच्या विरुद्ध ठामपणे उभे ठाकले; ते पाहिले, की ते ‘जनआरोग्य योद्धा’ म्हणण्यास खऱ्या अर्थाने पात्र ठरतात...