Home Authors Posts by थिंक महाराष्ट्र

थिंक महाराष्ट्र

125 POSTS 5 COMMENTS

मुंतोजी – मुसलमान मराठी संतकवी

अनेक मुसलमान संतकवी महाराष्ट्रात पंधराव्या शतकापासून ते अठराव्या शतकापर्यंत होऊन गेले आहेत. त्यांनी मराठी भाषेत अभंग लिहिले. त्यांमधील अग्रगण्य कवी म्हणजे शहा मुंतोजी ब्रह्मणी किंवा मुंतोजी बामणी. ते ‘मृत्युंजयस्वामी’ या नावाने प्रसिद्ध होते. ते एकनाथ-तुकाराम यांच्या काळातील. ते शहा मुतबाजी कादरी आणि ‘ज्ञानसागर अय्या’ अशा नावांनीही ओळखले जात. ते बहमनी राजघराण्यातील होते असे अनुमान आहे. त्यांना आनंद संप्रदायातील सहजानंद स्वामींचा गुरूपदेश मिळाला होता...

गोविंदभाई श्रॉफ यांच्यावर संकेतस्थळ (Website On Govindbhai Shroff)

स्वातंत्र्यसैनिक गोविंदभाई श्रॉफ यांच्या जयंतीनिमित्त त्यांचा परिचय करून देणारे संकेतस्थळ गुरूवार, 24 जुलैला खुले झाले. हे संकेतस्थळ ‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’च्या वतीने तयार करण्यात आले आहे. वेबसाइटचे लेखन गिरीश घाटे यांनी केले आहे. जन्मशताब्दीवीरांच्या वेबसाईट्स या प्रकल्पाचे नाव ‘महाभूषण’ संकेतस्थळे असे आहे. त्या मालिकेतील हे आठवे संकेतस्थळ आहे. गोविंदभाई श्रॉफ यांचा स्वातंत्र्यसैनिक, समाजवादी विचारवंत म्हणून लौकिक होता. त्यांना पद्मविभूषण पुरस्काराने गौरवण्यात आले होते. त्यांची 24 जुलै ही एकशेचौदावी जयंती...

मृणाल गोरे यांची पाणीवाली बाई राष्ट्रीय पातळीवर (Mrunal Gore’s life story on...

मृणाल गोरे यांच्या स्मृतिदिनी, 17 जुलैला तिकडे दूर आसामात, गौहत्ती येथे त्यांच्या संघर्षमय जीवनाची कहाणी रंगमंचावर हिंदी भाषेत सादर होत आहे ! त्याचे लेखन केले आहे मुंबईच्या निवृत्त प्राध्यापक वसुधा सहस्त्रबुद्धे यांनी आणि सादरकर्त्या आहेत कन्नड भाषिक भागीरथी कदम. त्या राष्ट्रीय पातळीवर मानसन्मान मिळवलेल्या अभिनेत्री- दिग्दर्शक आहेत. सध्या त्या गौहत्तीमधील नाट्य विद्यालयाच्या प्राचार्य म्हणून जबाबदारी निभावतात. त्यांच्या कमलादेवी चट्टोपाध्याय यांच्या जीवनावरील नाट्यप्रयोग भारतात विविध ठिकाणी होत आहे. मृणाल गोरे यांची जीवनकथा त्याच प्रकारे भारतभर सादर होण्याची शक्यता आहे...

भारतरत्न नानाजी देशमुख यांच्यावर संकेतस्थळ (Bharatratna Nanaji Deshmukh Website)

समाजकार्यकर्ते नानाजी देशमुख यांच्या जीवनकार्याचा परिचय करून देणारे संकेतस्थळ मंगळवारी, ८ जुलैला खुले झाले. हे संकेतस्थळ ‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’च्या वतीने जन्मशताब्दीवीरांच्या प्रकल्पांतर्गत तयार केले आहे. वेबसाइटचे लेखन ललिता घोटीकर यांनी केले आहे आणि संपादन गिरीश घाटे यांनी. नानाजी देशमुख यांचे मूळ नाव चंडिकादास अमृतराव देशमुख. त्यांचा सामाजिक कार्यकर्ता आणि राजकारणी म्हणून मोठा लौकिक होता. त्यांनी शिक्षण, आरोग्य आणि ग्रामीण स्वावलंबन या तीन क्षेत्रांत मुख्यत: काम केले...

कागदावर शिक्षित पिढी! – रंगनाथ पठारे

रंगनाथ पठारे यांचे मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्यात मोलाचे योगदान आहे. ते मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी 2013 साली स्थापन झालेल्या अभ्यास समितीचे अध्यक्ष होते. ते मूलत: कथालेखक, कादंबरीकार आणि समीक्षक आहेत. ‘सातपाटील कुलवृत्तांत’ ही त्यांची महाकादंबरी आहे, जी मराठा समाजाच्या सात पिढ्यांचा इतिहास मांडते. त्यांनी संगमनेर महाविद्यालयात भौतिकशास्त्राचे प्राध्यापक म्हणून सदतीस वर्षे अध्यापन केल. पठारे म्हणजे विचार, संवेदना आणि शैली यांचा त्रिवेणी संगम. शासनाने पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीची केल्यामुळे त्यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेले पत्र...

इरावती कर्वे यांच्यावर संकेतस्थळ

‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’ हे 1900 ते 1930 या काळात महाराष्ट्रात जन्मलेल्या महनीय व्यक्तींची समग्र संकेतस्थळे तयार करत आहे. प्रकल्पात सुमारे तीनशे वेबसाइट तयार होणार आहेत. पैकी साने गुरुजी, स्वामी रामानंद तीर्थ, एस.एम. जोशी, व्ही. शांताराम आणि आबासाहेब गरवारे या पाच पूर्ण झाल्या आहेत. आणखी दहा वेबसाइट येत्या तीन महिन्यांत पूर्ण होतील. या प्रकल्पाचे नाव ‘महाभूषण’ संकेतस्थळे असे आहे. इरावती कर्वे यांचे नाव मानववंशशास्त्राच्या इतिहासात मोठे मानले जाते. त्यांच्या ‘युगांत’ या महाभारतावरील विश्लेषणात्मक पुस्तकाला 1968 साली साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता...

भाग्य-प्रारब्ध-नशीब-दैव : चांडाळ चौकडी (Fate and Destiny kill and not the machine!)

नीलम या लेखक-प्राध्यापक भगवान आणि आशा इंगळे यांच्या कन्या. ते दोघेही राज्यशास्त्र विषयाचे अध्यापक म्हणून निवृत्त आहेत. रॉबिन आणि नीलम इंगळे-लोबो हे जोडपे एअर इंडियात कमांडर आहे. इंगळे यांचा मुलगा निखिलेशदेखील इंडिगोमध्ये कमांडर आहे. नीलम वीस वर्षे वैमानिक आहेत. काल अहमदाबाद येथे मोठा एअर क्रॅश घडला. त्यासंबंधीचे त्यांचे मत अतिशय महत्त्वाचे आहे...

त्रेपन्नावे साहित्य संमेलन (Fifty-third Marathi Literary Meet – 1979)

त्रेपन्नावे मराठी साहित्य संमेलन चंद्रपूर येथे 1979 साली आयोजित करण्यात आले होते. त्या संमेलनाचे अध्यक्ष वामन कृष्ण चोरघडे हे होते. ते विशेषतः लघुकथालेखनासाठी प्रसिद्ध होते. त्यांचा जन्म नागपूर जिल्ह्यातील नरखेड या गावी 16 जुलै 1914 रोजी झाला. त्यांनी नागपूर विद्यापीठातून मराठी व अर्थशास्त्र या विषयांत पदवी मिळवली. प्राध्यापक व प्राचार्य म्हणून शिक्षणक्षेत्रात कार्य केले. चोरघडे यांना एम ए झाल्यावर वर्ध्याला शिक्षकाची नोकरी मिळाली. त्यावेळी त्यांनी गांधीजींच्या आवाहनाला साद देऊन स्वातंत्र्यसंग्रामात उडी घेतली...

महाराष्ट्र राज्याचे मराठी भाषा धोरण (Marathi Language Policy of Maharashtra State)

मराठीतील लेखनविषयक नियम, मराठी वर्णमालाविषयक नियम, महाराष्ट्राचे भाषा धोरण, महाराष्ट्राचे सांस्कृतिक धोरण, मराठी भाषा विद्यापीठ ही भाषाविषयक पाऊले राज्य शासनाच्या पुढाकारातून घेण्यात आली. केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला. या चारही पावलांना सर्व मराठी समाजाने साथ द्यायला हवी. तरच मराठी भाषेच्या विकासाच्या दिशेला हातभार लागेल. महाराष्ट्र राज्याचे भाषा धोरण सोबतच्या लिंकवरून वाचता येईल...

महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक धोरण (Cultural Policy of Maharashtra State)

महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक धोरणात पुनरावलोकन समितीने केलेल्या शिफारसी संबंधीचा शासन निर्णय. सांस्कृतिक वारसा, कला, परंपरा आणि सामाजिक मूल्यांचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी शासनाने गठित केलेल्या समितीच्या सांस्कृतिक धोरणातील शिफारशीतील निश्चित केलेली महत्त्वाची क्षेत्रे पुढीलप्रमाणे आहेत...