Home Authors Posts by तन्मय कानिटकर

तन्मय कानिटकर

2 POSTS 0 COMMENTS
Member for 6 years 8 months तन्मय कानिटकर यांनी पुणे विद्यापीठातून कायद्याची पदवी (LLB) आणि कम्युनिकेशन स्टडीज या विषयांत पदव्युत्तर (MSc) शिक्षण पूर्ण केले आहे. ते सुशासनासाठी कार्यरत असणाऱ्या परिवर्तन संस्थेचे संस्थापक विश्वस्त आहेत. ते पॉलिसी रिसर्च ऑर्गनायझेशन या पुण्यातील थिंक टँकचे संस्थापक अध्यक्ष आहेत. त्यांनी उत्तराखंड, पश्चिम महाराष्ट्र येथे पूरग्रस्त भागात जाऊन मदतकार्य केले. त्यांनी ग्रीनअर्थ सोशल डेव्हलपमेंट कन्सल्टन्सी येथे ‘शासनव्यवस्था’ या विषयातील तज्ज्ञ सल्लागार म्हणून काम केले आहे. त्यांनी सकाळ, लोकमत, महाराष्ट्र टाईम्स यासारखी दैनिके; लोकप्रभा, विवेक, माहेर, प्रपंच आणि ऑब्जर्व्हर रिसर्च फाउंडेशन (ORF) सारख्या ऑनलाईन पोर्टल्सवर सामाजिक-राजकीय विषयांवर विपुल लेखन केले आहे. त्यांचा कथासंग्रह आणि लग्न-नातेसंबंध विषयावरील लेखसंग्रह अशी दोन पुस्तके प्रकाशित झाली आहेत. तसेच, त्यांनी लिहिलेली एक वेबसिरीज प्रदर्शित झाली असून, एक राजकीय कादंबरी प्रकाशनाच्या वाटेवर आहे. त्यांच्या व्यक्तिगत ब्लॉगवर दोन लाखपेक्षा अधिक वाचक आहेत.

हिंदू राष्ट्र असेल तरी कसे ?

‘हिंदू राष्ट्राची’ चर्चा 2014 पासून म्हणजे भारतीय जनता पक्ष सत्तेत आल्यापासून अधिकच जोमाने झाली. अयोध्येतील वादग्रस्त जागेचा निकाल, ट्रिपल तलाक सारखे कायदे रद्द होणे आणि नागरिकत्व कायद्यातील दुरुस्ती यामुळे तर अधिकच व्यापकपणे ही चर्चा होऊ लागली. पण ‘हिंदू राष्ट्र’ म्हणजे काय?

अरुण देशपांडे यांची सोला(र)पूरची प्रयोगशाळा

जूनचा पहिला आठवडा. मान्सूनचा पत्ता नाही. उन्हाळा संपत आलेला, नद्या-नाले कोरडे ठणठणीत. भगभगीत उजाड माळरान. एखाद्या गावाजवळ थोडीफार दिसणारी हिरवी शेती. बाकी सगळीकडे पिवळ्या...