Home Authors Posts by स्वाती दीक्षित

स्वाती दीक्षित

1 POSTS 0 COMMENTS
स्वाती दीक्षित या ‘सिम्बायोसिस कॉलेज ऑफ आर्ट्स आणि कॉमर्स’च्या माजी भूगोल विभागप्रमुख आहेत. त्यांना पस्तीस वर्षे अध्यापनाचा अनुभव आहे. त्या पर्यावरण विषयावरील विविध कार्यक्रमांमध्ये सक्रियपणे सहभागी होतात. त्यांनी विषमुक्त जीवनशैली आणि पर्यावरणास अनुकूल उत्पादने यावर आधारित कार्यशाळा घेतल्या आहेत. त्यांनी सेंद्रीय कचर्‍याचा वापर करून इमारतीवर भाज्या आणि फळे पिकवली आहेत. त्यांनी कवी विंदा करंदीकर यांच्या साहित्यावर आधारित अनेक कार्यक्रम सादर केले आहेत.9420175834

पर्यावरण – प्रश्न आहे लाइफस्टाइलचा (Environment and the Lifestyle)

रिव्हर सिस्टिम ही भूगोलातील नवी संज्ञा. शाळेत नदीचा धडा म्हणजे माहीत असे, की उगम, टप्पे, खनन, वहन, भरण क्रिया आणि भूरूपे! नदीचे महत्त्व म्हणजे तिच्यापासून फक्त आणि फक्त माणसाला मिळवायच्या फायद्यांची यादी! आणि नंतर आला ‘Multidisciplinary Approach’? समर्थ रामदासांची उक्ती आहे- ‘भूगोळ आहे भूमंडळी’ आणि विश्वाची प्राचीनता हे प्रमाण मानले जाते माणसाच्या जगण्याचे.