1 POSTS
स्वागत थोरात हे बहुपेडी व्यक्तिमत्त्व आहे. ते चित्रकार, संपादक, वन्यजीव छायाचित्रकार, नाट्य दिग्दर्शक अशा विविध क्षेत्रांत वावरतात. त्यांनी ‘स्पर्शज्ञान’ नावाचे ब्रेल लिपीतील नोंदणीकृत मराठी आणि हिंदी पाक्षिक सुरू केले. ते ‘ब्रेलमन ऑफ इंडिया’ म्हणून ओळखले जातात. त्यांनी ‘तीन पैशांचा तमाशा’, ‘संगीत समिती स्वयंवर एकांकिका’, ‘अपूर्व मेघदूत’ अशी नाटके अंध विद्यार्थ्यांना घेऊन दिग्दर्शित केली आहेत. त्यांना सीएनएन-आयबीएन आणि रिलायन्स इंडस्ट्रीज तर्फे ‘रिअल हिरो’, लुई ब्रेल शिक्षण संस्थेतर्फे ‘लुई ब्रेल’, स्नेहालय-अनाम प्रेम व वुई नीड यू अशा अनेक संस्थांचे पुरस्कार मिळाले आहे.