1 POSTS
सुलभा आरोसकर यांचे शिक्षण बी ए पर्यंत झाले. त्यांनी ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’मध्ये नोकरी केली. त्यांनी लोकसत्ता चतुरंग आणि अन्य काही मासिकांत लेखन केले. त्यांचे काही लेख 'पोलादी दिव्यांग' हया पॅरांप्लेजिक होतकरू व्यक्तींवरील पुस्तकात प्रसिद्ध झाले आहेत. त्या ठाण्यातील आचार्य अत्रे कट्टा, सायनचे पॅराप्लेजिक फाऊंडेशन, ऐरोलीची मतिमंद, कर्णबधीर मुलांची शाळा संजीवन दीप, अहमदनगरचे माऊली सेवा प्रतिष्ठान, विद्यादान सहाय्यक मंडळ या संस्थांच्या कार्यात सहभागी असतात.