सुलभा आरोसकर
सुचेता-राजेंद्र धामणे डॉक्टर दांपत्याचे मनगाव
राजेंद्र आणि सुचेता धामणे ह्या डॉक्टर दांपत्याचे सहजीवन सुरू झाले तेच मुळी समाजासाठी काहीतरी करावे या समविचाराने. दोघेही एकत्र होमिओपॅथी वैद्यकीय महाविद्यालयात शिकलेले. कॉलेजमध्ये शिकत असतानाच गरजूंना मदत करत असत. वैद्यकीय पदवी पंचवीस वर्षापूर्वी 1998 मध्ये घेतल्यानंतर त्यांनी दोघांनी मिळून लगेच माऊली या संस्थेची स्थापना केली. त्यांनी शिंगवे तालुक्यात (जिल्हा नगर) मोबाईल क्लिनिक चालवले. वाड्यावस्त्यांवर, आदिवासी वस्त्यांवर जाऊन तेथील रुग्णांवर मोफत वैद्यकीय उपचार केले. दोघांनी वीस बेडचे रुग्णालयही सुरु केले. तेथे सगळ्या सोई सुविधा होत्या...