2 POSTS
सुहासिनी किर्तीकर या ‘मुंबई मराठी साहित्य संघा’च्या ‘अक्षरदालन’ या उपक्रमाच्या प्रमुख आहेत. त्यांनी अडतीस वर्षे विविध महाविद्यालयांत मराठीचे अध्यापन केले. त्या उपप्राचार्या म्हणून निवृत्त झाल्या. त्यांनी मुंबई विद्यापीठातून मराठी आणि संस्कृत या विषयांत एम ए केले. त्या सरदार अली जाफरी यांच्याकडे उर्दू शिकल्या. त्यांचे लेखन विविध मासिकांत, वृत्तपत्रांत आणि दिवाळी अंकांत प्रसिद्ध झाले आहे. त्यांना उत्कृष्ट शिक्षक म्हणून एकलव्य पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले आहे.9820256976