1 POSTS
सुबोध गुरुजी हे स्वत: चित्रपट प्रसिद्धीचे उत्तम साहित्य निर्माण करत. त्यांनी चित्रपटांची पोस्टर जमा करण्याचा छंद बाळगला. त्यांचे शिक्षण जी डी आर्ट (उपयोजित) झाले आहे. त्यांनी कला दिग्दर्शन, स्थिरचित्रण, प्रसिद्धीकला म्हणून मराठी, हिंदी, गुजराती या भाषांतील पंचेचाळीसहून अधिक चित्रपटांचे काम केले आहे. त्यांनी मुंबई व दिल्ली येथे प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात चित्ररथ संकल्पना व उभारणी करून अकरा वेळा सहभाग नोंदवला आहे. त्यामध्ये नऊ वेळा प्रथम पारितोषिक प्राप्त केले आहे. त्यांनी साहित्य संमेलने, नाट्य संमेलने, जागतिक मराठी परिषद, बाबुराव पेंटर, अबालाल रहेमान आणि बालगंधर्व यांच्या जन्मशताब्दी या सर्व कार्यक्रमांनिमित्त रंगमंच व परिसर सजावट केली आहे. त्यांची विविध मानचिन्हांसाठी- आयफा, जागतिक मराठी परिषद वगैरे संकल्पना व चित्रांकने आहेत. त्यांची चित्रप्रदर्शने अनेक कलादालनांत झाली आहेत.