1 POSTS
सुभाष भी.बोरसे हे राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बॅंकेचे निवृत्त अधिकारी आहेत. ते साक्षेपी वाचक आणि ग्रंथसंग्राहकही आहेत. त्यांनी आतापर्यंत 'माझी निवड आपली सवड' या नावाने विविध नियतकालिके, वर्तमानपत्रे यांमध्ये आलेले साडेनऊशे लेख स्वत:च्या टिप्पणीसह मित्रमंडळींस पाठवले आहेत. त्यांना विविध खेळांतही रस आहे. ते जव्हार येथे मुक्कामी असतात.