2 POSTS
सुभाष भेंडे हे खुमासदार विनोदी शैलीत लेखन करणारे गोव्याचे साहित्यिक. भेंडे यांनी अर्थशास्त्राची डॉक्टरेट मिळवली होती. त्यांनी मध्यमवर्गीय जीवन, उच्चभ्रू समाज, शिक्षण क्षेत्र अशा विविध विषयांवर अत्यंत मार्मिक लेखन केले आहे. त्यांनी कादंबरी, विनोद, प्रवासवर्णन, व्यक्तिचित्रं, नाटकं, बालवाङ्मय असे सर्वच प्रकार हाताळले आहेत. ते गोव्याचे असल्याने त्यांच्या आमचे गोयं आमका जाय, आदेशही, जोगीण यांसारख्या कादंबऱ्यांमध्ये गोव्याची पार्श्वभूमी दिसते. ते कराडमध्ये भरलेल्या 2003च्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. त्यांची अनेक पुस्तके प्रसिद्ध आहेत.