Home Authors Posts by सुभाष भेंडे

सुभाष भेंडे

2 POSTS 0 COMMENTS
सुभाष भेंडे हे खुमासदार विनोदी शैलीत लेखन करणारे गोव्याचे साहित्यिक. भेंडे यांनी अर्थशास्त्राची डॉक्टरेट मिळवली होती. त्यांनी मध्यमवर्गीय जीवन, उच्चभ्रू समाज, शिक्षण क्षेत्र अशा विविध विषयांवर अत्यंत मार्मिक लेखन केले आहे. त्यांनी कादंबरी, विनोद, प्रवासवर्णन, व्यक्तिचित्रं, नाटकं, बालवाङ्‌मय असे सर्वच प्रकार हाताळले आहेत. ते गोव्याचे असल्याने त्यांच्या आमचे गोयं आमका जाय, आदेशही, जोगीण यांसारख्या कादंबऱ्यांमध्ये गोव्याची पार्श्वभूमी दिसते. ते कराडमध्ये भरलेल्या 2003च्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. त्यांची अनेक पुस्तके प्रसिद्ध आहेत.

विद्याधर गोखले : एक हजरजबाबी व्यक्तिमत्त्व !

आपल्याकडे पराभूत उमेदवारानं संमेलनाकडे फिरकायचं नसतं, अशी रीत आहे. त्या दृष्टीनं गोखले बंडखोर, पुरोगामी प्रवृत्तीचे; रीतीभातींना ते जुमानत नाहीत ! खिलाडूपणा रोमरोमी भिनलेला...

अनंत काणेकर – अस्सल मराठी बाणा (Anant Kanekar)

0
अनंत काणेकर नेहमी म्हणत, ‘माणसाने नुसते जगू नये, जगण्याला काही अर्थ आहे का हे सतत शोधत राहवे’. काणेकर स्वत: त्यांचे पंच्याहत्तर वर्षांचे आयुष्य अर्थपूर्ण, आनंदी वृत्तीने जगले आणि त्यांनी त्यांच्या सहवासात येणाऱ्या सर्वांना प्रसन्न वृत्तीने कसे जगावे हे शिकवले. त्यांचे मूळ गाव मालवणचे मेढे. त्यांनी मराठीचे प्राध्यापक म्हणून काम मुंबईच्या खालसा कॉलेजात पाच वर्षे आणि सिद्धार्थ महाविद्यालयात चोवीस वर्षे केले...