स्मिता जोगळेकर या मुंबईतील बोरिवली येथे राहतात. त्यांनी लेखन, संपादन, मुद्रितशोधन व अनुवाद या क्षेत्रांत काम केले आहे. त्या फ्रीलांसर म्हणूनही काम करतात. त्यांनी कॉम्प्युटर सायन्समध्ये पदवी मिळवली आहे.
गाडगेबाबा जिथं जिथं न्यून जाणवलं, तिथं तिथं ते भरून काढण्यासाठी नेटानं प्रयत्न करत राहिले. अनेकांची आयुष्यं त्यांच्या सहवासाच्या लेपानं सुगंधित झाली. गाडगेबाबा सभोवती माणसांचा समुद्र पसरलेला असतानाही आतून नि:संग राहिले...