शोभा घोलप
निळोबारायांची अभंगार्तता
ज्ञानदेवांनी जी भक्ती कल्पना मांडली, संत नामदेवांनी ज्या भक्तीचा प्रसार पंढरी ते पंजाबपर्यंत केला, तुकोबांनी ज्या भक्तीचे गोडवे गायले; निळोबांनी त्याच भक्तीचा प्रसार पुढे, दोन शतकांनंतर केला. देव आणि भक्त एक होऊनही भक्तीच्या सुखासाठी वेगवेगळे राहतात ही अद्वैतातील भक्तीची त्यांची कल्पना. त्या भक्तीमुळे आत्मज्ञान प्राप्त होते असा साऱ्या संतांचा अनुभव आहे...