Home Authors Posts by शिरीन कुलकर्णी

शिरीन कुलकर्णी

1 POSTS 0 COMMENTS
शिरीन कुलकर्णी यांचे शिक्षण एम ए झाले आहे. त्या प्रथम रुईया, नंतर एस.आय.ई.एस. ‌आणि त्यानंतर आय.सी.एल. शिक्षणसंस्थेच्या मोतीलाल झुनझुनवाला महाविद्यालयात छत्तीस वर्षे शिकवत होत्या. त्यांचे साहित्यप्रेमी भगिनी मंडळाच्या स्त्रीलिखित साहित्याचा आढावा घेणाऱ्या खंडांमध्ये स्त्री लिखित कादंबऱ्यांचा आढावा घेणारे लेख प्रसिद्ध झाले आहेत. त्यांनी वर्तमानपत्रे आणि नियतकालिकांमधूनही लेखन केले आहे.

शेखबाईंच्या सहवासात (In the Company of Sheikh Madam)

ज्येष्ठ आणि साक्षेपी वैयाकरणी, यास्मिन शेख यांनी 21 जून रोजी, वयाच्या शंभराव्या वर्षात पदार्पण केले. त्या तल्लख आणि कार्यमग्न आहेत. व्याकरण आणि भाषाशास्त्र हे त्यांच्या आयुष्यभराच्या ध्यासाचे विषय आहेत. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे महत्त्वाचे पैलू म्हणजे परिपूर्णत्वाचा ध्यास आणि स्पष्टवक्तेपणा. त्यांनी सर्वसामान्य वाचक, अभ्यासक, संशोधक, पत्रकार यांच्या सोयीसाठी ‘मराठी शब्दलेखन कोश’ तयार केला. राज्य मराठी विकास संस्थेसाठी ‘मराठी लेखन मार्गदर्शिका’ तयार केली. त्यांनी वृत्तपत्रांमधून भाषाविषयक लेखन केले. शेखबाईंच्या हाताखाली काम करणाऱ्या शिरीन कुलकर्णी यांनी बाईंकडून लाभलेल्या ज्ञानकणांविषयी कृतज्ञतेने आणि जिव्हाळ्याने लिहिले आहे...