1 POSTS
शीला वागळे या ठाण्यात राहतात. त्या पदवीधर आहेत. त्यांनी टेक्सटाइल डिझाईनरचा अभ्यासक्रम पूर्ण केलेला आहे. त्या टेक्सटाइल डिझायनर म्हणून लग्नाआधी व्यवसाय करत होत्या. लग्नानंतर, त्यांनी नव्वद मुलांची बालवाडी सत्तावीस वर्षे चालवलेली आहे. त्यांना ओरीगामी, विविध माध्यमांमध्ये पेंटिंग, वाचन, लेखन, कविता करणे असे छंद आहेत. त्या आचार्य अत्रे कट्टा नौपाडा या संस्थेशी बावीस वर्षांपासून जुडलेल्या आहेत. तसेच, त्यांचा फोटो सर्कल सोसायटी, सिग्नल शाळा, फॅण्ड्री फाऊंडेशन, केअर फॉर नेचर, वनवासी कल्याण आश्रम या संस्थांशीही जवळचा संबंध आहे.