शर्मिष्ठा भोसले
सेवालय – एका प्रार्थनेची गोष्ट
‘‘इतनी शक्ती हमे देना दाता, मन का विश्वास कमजोर हो ना...’’
चिमणीसारखी असलेली चिमणी, विश्वास, गायत्री, अनिकेत, सोनाली, अक्षय ....सारेजण डोळे मिटून प्रार्थना म्हणत असतात....
वेगळ्या वाटेचं गाणं गाताना
प्रोफेशनॅलिझमशिवाय इतर कुठलाच ‘इझम’ न मानणारी आमची ही ‘जनरेशन नेक्स्ट’. समाजवादाला ‘आदर्शवाद’ म्हणून हिणवत आउटडेटेड ठरवणार्यांचा हा काळ!
पण संगमनेरला झालेल्या ‘छात्रभारती’च्या अधिवेशनात मात्र गटचर्चा,...
ज्याचा त्याचा विठोबा
सातार्यातील तीन खेडी-त्यांनी ग्रामविकासाचा आणि सामाजिक एकात्मतेचा आदर्श उभा केला आहे... उदयगिरीच्या तरुण शार्मिष्ठाची धावत्या दौर्यानंतरची संवेदनाशील नोंद
संस्थाजीवन
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या नवभारत युवा आंदोलनाने महाराष्ट्रातील...
ज्याचा त्याचा विठोबा
‘धामणेर’, ‘निढळ’ आणि ‘लोधवडे’... ग्रामस्वच्छता अन् निर्मल ग्राम अभियानात रोल मॉडेल ठरलेल्या या खेड्यांमध्ये, किंबहुना, ढोबळ बोलायचं तर सार्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये, शिवाराच्या पंढरीतला हिरवा विठ्ठल पाण्यावाचून करपला म्हणून मरणाची वारी करणारा बळीराजा मला दिसला नाही!....उलट, इथं मस्कतला डाळींब निर्यात करणारा निरक्षर साधाभोळा शेतकरी भेटला… घोटभर पाण्यासाठी पाखरागत वणवण हिंडणार्या लेकीबाळी भेटल्या नाहीत ... उलट, इंडो-जर्मन प्रकल्प अन् जलस्वराज्य योजनेतून तंत्रशुद्धपणे घालून दिलेले पाणीव्यवस्थापनाचे आदर्श भेटले… एरवी शाहरुखचा ‘स्वदेस’ थिएटरमध्ये बघताना भारावलेला अन् प्रत्यक्षात उच्च शिक्षण घेऊन फॉरेनला त्यातल्या त्यात शहरात जायची स्वप्नं बघणारा तरुण इथं भेटला नाही...