Home Authors Posts by शंकर बोऱ्हाडे

शंकर बोऱ्हाडे

22 POSTS 0 COMMENTS
शंकर बो-हाडे हे पिंपळगाव, नाशिक येथील 'कर्मवीर काकासाहेब वाघ महाविद्यालया'त मराठीचे प्राध्यापक आहेत. ते सिन्नर गावात 'साहित्य रसास्वाद' हे वाङ्मय मंडळ चालवतात. बो-हाडे हे 'राष्ट्र सेवा दला'चे सैनिक. बो-हाडे नामांतर चळवळीत सत्याग्रह करून शिक्षणावर तुळशीपत्र ठेवून जेलमध्ये गेले. ते परिवर्तनवादी, दलित चळवळ व साहित्य याचे अभ्यासक आहेत. त्यांनी पत्रकार 'जागृति'कार पाळेकर यांच्या साहित्याच्या संशोधनानिमित्ताने मराठी पत्रकारितेच्या इतिहासाचा अभ्यास केला. ते गेली तीन दशके नाशिकच्या वृत्तपत्रातून लेखन करतात. त्यांनी लिहिलेला, 'ठाणे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलना'चे अध्यक्ष उत्तम कांबळे यांच्या अध्यक्षीय भाषणाची चिकित्सा करणारा लेख विशेष गाजला होता. त्यांची चार स्वतंत्र व दोन संपादित पुस्तके प्रसिध्द आहेत. त्यांची कार्यकर्ता लेखक अशी ओळख आहे. लेखकाचा दूरध्वनी 9226573791
carasole

कुंभमेळ्यातील महाइव्हेंट

हिमालयबाबाचा एकशेआठ दिवसांचा यज्ञ नाशिकला कुंभमेळा चोवीसशे कोटींवर पोचला आहे! महापालिका, जिल्हाधिकाऱ्यांचे कार्यालय, आरोग्यविभाग आणि पोलिस या यंत्रणांचा आधुनिक हायटेक यंत्रणा उभारण्याकडे कल आहे. साधुग्राम...

बहुजन सांस्कृतिकवादाकडे – जयंत पवार

‘बहुजन सांस्कृतिकवादाकडे’ हा जयंत पवार यांचा लेख हे विद्रोही साहित्य संमेलनाचे भाषण मनोहर कदम यांच्या पश्चात प्रसिद्ध झालेल्या पुस्तकात समाविष्ट करण्यात आला आहे. जयंत...