2 POSTS
शंभूनाथ दामोदर गानू यांचा जन्म 1948 चा. महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळात 'डेप्युटी चीफ इंजिनीअर' या पदावर पस्तीस वर्षे कार्यरत होते. ते 2006 साली निवृत्त झाले. त्यांनी सुनिल गावस्कर यांच्यावरील छोटेखानी पुस्तकासोबत 'माझ्यासारखा मीच', 'कल्पवृक्ष आशिदाचा' अशा चरित्रग्रंथांचे लेखन केले आहे. त्यांनी शब्दांगण आणि उद्योगश्री या मासिकांतून लिखाण केले आहे. त्यांचा आकाशवाणी मुंबईवर मुलाखतकार म्हणून तर दूरदर्शनवरील किलबिल या मालिकेत कवी अणि संगीतकार म्हणून सहभाग होता. पुस्तकांच्या मुद्रितशोधनासोबत त्यांनी 'रविवार लोकसत्ता' मध्ये सतत सोळा वर्षे शब्दकोड्यांची रचना केली.