1 POSTS
सतीश शिंदे हे भारतीय सैन्यदलात समुपदेशक म्हणून पठाणकोट येथे नोकरीत आहेत. त्यांचे पदवी शिक्षण मायक्रोबायलॉजीत झाले. त्यांनी दिल्लीच्या मिलिटरी कॉलेजमधून क्लिनिकल सायकोलॉजी विषयाची पदवी मिळवली. त्यांना गडकिल्ले हिंडण्याफिरण्याचा व तत्संबंधी माहिती जमवण्याचा छंद आहे. त्यांनी ‘पर्णालपर्वतग्रहानाख्यान’ (जयराम पिंडे कृत) व अलिजाबहाद्दर महादजी शिंदे (बॅ. नातू कृत) पुस्तकांचे पुनर्प्रकाशन केले आहे. त्यांनी ‘बा रायगड’ व ‘बा रायगडवारी’ ह्या दुर्ग रायगडावर लिहिलेल्या अंकांचे संपादन केले. त्यांनी ‘दुर्गभ्रमणगाथा’ ही संस्था निर्मिली आहे.