1 POSTS
सारंग शंतनू दर्शने हे दैनिक महाराष्ट्र टाइम्सचे (मुंबई) वरिष्ठ सहसंपादक आहेत. त्यांनी सकाळ, तरुण भारत, लोकसत्ता या वर्तमानपत्रांत पत्रकारिता केली आहे. दर्शने बी. कॉम – एम. ए. झाले. त्याखेरीज त्यांनी हस्तलिखित शास्त्रापासून आयुर्वेदापर्यंत विविध विद्याशाखांचा अभ्यास केला आहे. त्यांनी मुंबई प्रेस क्लबच्या वतीने पाकिस्तानचा अभ्यासदौरा केला आहे. त्यांनी दुसरा गांधी अर्थात राळेगणचे अण्णा (चरित्र), शोध राजीव हत्येचा (अनुवाद), मीरा आणि महात्मा (अनुवाद), कुमार माझा सखा (शब्दांकन), ग्रंथांच्या सहवासात (संपादन), स्थित्यंतर (संपादन), ग्रंथाली 35, गांगल 70 (लेखन सहभाग) आणि अटलजी – कविहृदयाच्या राष्ट्रनेत्याची चरितकहाणी या पुस्तकांचे लेखन केले आहे. 9821504025