संजीवनी नागनाथ साव यांचे शिक्षण एम ए बी एड असे झाले आहे. त्यांनी अध्यापक म्हणून माध्यमिक शाळेत सव्वीस वर्षे काम केले. त्यांना वाचन-लेखन व पर्यटन यांची आवड आहे. त्यांचे लेखन विविध नियतकालिकांत प्रसिद्ध झाले आहे. त्या मुख्यतः कविता करतात.
अरुण महाजन हा तुर्कस्थानातील ‘अरारट’ या पर्वताचे सर्वात उंच शिखर गाठणारा तरुण. तो तेथे पोचलेला बहुधा पहिला व एकमेव मराठी तरुण असावा. महाराष्ट्रीय तरुण जगात वेगवेगळ्या ठिकाणी जातात आणि त्यांच्या बुद्धीची, पराक्रमाची चुणूक वेगवेगळ्या क्षेत्रांत दाखवतात. पण गिर्यारोहणाचे क्षेत्र सर्व धाडसी तरुणांना मोहवते असे जाणवते आणि तेथील आव्हानेही अगदीच वेगळी असतात ! तेथे अंगात धाडस, हिंमत असणे गरजेचे आहेच; शिवाय, जोखीम पत्करण्याची मनस्थिती असावी लागते आणि पैसा व वेळ, दोन्ही बरेच आवश्यक असतात. अरुण महाजन हा उमदा मराठी तरुण इलेक्ट्रिकल आणि संगणक या दोन शाखांमधील पदवीधर आहे, तो आयटी क्षेत्रात कार्यरत आहे. सध्या तो कॅलिफोर्नियातील ‘पालो अल्टो’ या शहराचा निवासी आहे...
माझे पुलगाव हे माझ्या जिवाभावाचे गाव. या गावाशी असलेले माझे नाते अजोड आहे. माझ्या आयुष्यातील महत्त्वाचे टप्पे त्या गावाने पाहिले आहेत. माझे लहानपण, शिक्षण, लग्न या महत्त्वपूर्ण दिवसांचे ते साक्षीदार आहे. म्हणूनच पुलगाव सोडून पन्नास वर्षे झाली तरी त्या गावाशी असलेली माझी नाळ तुटलेली नाही. त्या गावाने मला आयुष्यभराचा लळा लावला आहे. ‘सेंट्रल अॅम्युनेशन डेपो’ हे पुलगावचे वैशिष्ट्य आहे. त्या डेपोमुळे गाव प्रसिद्धीच्या झोतात आले...