समीर गायकवाड हे ब्लॉगर आहेत. त्यांच्या ब्लॉगला 'ब्लॉग माझा स्पर्धा 2016' मध्ये प्रथम क्रमांक मिळाला होता. ते विविध सामाजिक विषयांवर लेखन करतात. गायकवाड यांचे विविध वर्तमानपत्रांत सदर लेखन प्रसिद्ध झाले आहे.
‘इन्साफ का तराजू’ने थोडेफार नाव कमावलेल्या राज बब्बरने ‘आज की आवाज’मध्ये त्याची नायिका झालेल्या स्मिताला जाळ्यात अडकावले. स्मितानेदेखील त्या काळात कोणाचे मत जुमानले नाही, ती होतीच तशी बंडखोर ! लग्न झालेला संसारी पुरुष तिने निवडला. ती दोघे ‘लिव्ह इन’मध्ये 1980 च्या दशकात राहत होते यावरून त्यांच्या बेफिकीर आणि धाडसी वृत्तीची प्रचीती यावी...