1 POSTS
सखाराम डाखोरे हे वसईच्या अण्णासाहेब वर्तक मानव्य महाविद्यालयात मराठी विभागात सहाय्यक प्राध्यापक आहेत. त्यांनी बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून (औरंगाबाद) ‘मराठी व हिंदी या भाषांतील आदिवासी कवितेचा तौलनिक अभ्यास’ या विषयावर पीएच डी पदवी २०१७ मध्ये प्राप्त केली. त्यांचा ‘रानवा’ हा कवितासंग्रह प्रसिद्ध आहे. ते वक्ते आणि कार्यक्रमांचे सादरकर्ते म्हणून परिचित आहेत. ते मासिके- ग्रंथ यांचे संपादन आणि साहित्य-समाज-चळवळी अशा कामांतही गुंतलेले आहेत.