1 POSTS
सहदेव आबासाहेब चौगुले-शिंदे हे प्राध्यापक-लेखक आहेत. ते कोल्हापूरच्या शाहूवाडी तालुक्यातील भेडसगावचे. ते राहतात कोल्हापूरला. त्यांनी बी ए, एम ए (इंग्रजी), एलएल बी, पीएच डी असे शिक्षण घेतले आहे. त्यांनी वकिलीची सनदही घेतली, पण त्यांनी प्रॅक्टिस केली नाही. त्यांनी इंग्रजी विषय बार्शी, वारणानगर, निपाणी येथील कॉलेजांत आणि नंतर निवृत्तीपर्यंत शहाजी लॉ कॉलेजात शिकवला. त्यांचे शब्दसावल्या (काव्यसंग्रह), प्रतिभेच्या पंखावर (सव्वीस इंग्रजी कवींचा मराठीतून परिचय), पाथेय भाग 1-3 (चरित्रसंग्रह- राष्ट्रीय, राज्यस्तरीय), छंद अक्षरांचा (ललित लेख), शब्द आणि संकल्पना (वैचारिक लेख), सोनेरी शब्दशिल्पे (दहा जागतिक लेखक), साहित्यिक यशवंतराव, चाहूल आणि काही इंग्रजी पुस्तकांचा मराठीतून अनुवाद असे विपुल लेखन प्रकाशित झाले आहे. त्यांचे स्फूट लेखन मराठी वृत्तपत्रांत प्रसिद्ध होत असते. 9823431282