सहदेव चौगुले-शिंदे
यशवंतराव आणि हॅम्लेट (Did Y B Chavhan face Hamlet’s crisis in public life?)
यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री चार वेळा झाले. ते मुरब्बी राजकारणी व दूरदृष्टीचे समाजकारणी होते. त्यांनी महाराष्ट्रातील ‘माळावरचा माणूस’ उभा केला, सहकाराचे अमृत सर्वसामान्यांपर्यंत पोचवले, शिक्षणाचा संदेश घरोघरी नेला - त्यांनी हवालदिल शेतकऱ्यांसाठी ‘कसेल त्याची जमीन’ हा कायदा राबवून त्याची मातीशी जोडलेली नाळ घट्ट केली.