4 POSTS
सदानंद कदम हे निवृत्त प्राथमिक शिक्षक आहेत. त्यांचे शिक्षण व लेखनकर्तृत्व अफाट आहे. ते इतिहास व मराठी, दोन्ही विषयांत एम ए आहेत. त्यांचा विविध सांस्कृतिक संस्थांशी संबंध आहेच. त्यात इतिहास, नाट्य, साहित्य अशा राज्य परिषदा आहेत. त्यांच्या संग्रही सहा हजार पुस्तके आहेत. त्यांनी स्वत: पंचवीसएक पुस्तके लिहिली आहेत. त्यांचे स्वत:चे लेखन ललित, माहितीपर, चरित्रात्मक अशा स्वरूपाचे व प्रतिष्ठाप्राप्त आहे. दुर्मीळ नाणी, सह्या, ध्वनिफिती, प्रकाशचित्रे असे विविध संग्रह त्यांच्या व्यक्तिगत दफ्तरात आहेत.