Home Authors Posts by सदानंद डबीर

सदानंद डबीर

4 POSTS 0 COMMENTS
मराठी गजलकारांच्या दुसर्‍या पिढीतील महत्वपूर्ण गजलकार म्हणजे कवी व गजलकार सदानंद डबीर. ते मूळचे धुळे जिल्ह्यातील पण अस्सल मुंबईकर. सदानंद डबीर यांनी ए एम आय इंजिनीअरींग ही पदवी प्राप्त केल्यानंतर पश्चिम रेल्वेत वरिष्ठ विद्युत अभियंता म्हणून पस्तीस वर्षे काम केले. त्यांनी महाविद्यालयात असताना कथा-कविता लिहिल्या. गीतलेखन करणारे सदानंद डबीर गजलकडे वळले ते कवि सुरेश भट यांच्यापासून मिळालेल्या प्रेरणेने. त्यांनी सुरेश भट यांनाच त्यांची पहिली गजल पाठवली व ती भट यांना खूपच आवडली व ती प्रकाशित झाली. सदानंद डबीर हे आकाशवाणी मुंबईचे मान्यताप्राप्त कवि आहेत. त्यांनी अनेक कार्यक्रम आकाशवाणीवर सादर केले आहेत. त्यांनी नवीन संगीत नाटकांसाठी गीत लेखन केले आहे. त्यांचे गजलेवरचे उत्तम लेख सामना, महाराष्ट्र टाइम्स , लोकसत्ता या दैनिकांत प्रसिध्द झाले आहेत. त्यांचे ‘लेहरा’, ‘तिने दिलेले फूल’, ‘सावलीतील उन्हे’, ‘खयाल’, ‘गारुड गजलचे’, ‘आनंद भैरवी’, ‘साकिया’, ‘छांदस’ आणि ‘अलूफ’ हे गजल, गीत आणि कवितासंग्रह प्रकाशित आहेत.
carasole

मराठी गझल – अहाहा! टमाटे किती स्वस्त झाले !

चंद्रशेखर सानेकर यांच्या "गझल आणि ‘ग्रामीण गझल’" या लेखाच्या निमित्ताने ज्येष्ठ गझलकार सदानंद डबीर यांनी व्यक्त केलेली प्रतिक्रिया ... 1. चंद्रशेखर सानेकर यांचा (एकूणच मराठी)...
तुकाराम महाराज उर्दू-हिंदीतही अभंग रचत

अभंगात गझलेचा शोध – एक व्यर्थ खटाटोप!

     अरुण भालेराव यांचा लेख वाचला. अभंग आणि गझल ह्या दोन काव्यप्रकारांचा आकृतिबंध वेगळा, तांत्रिक नियम वेगळे, असे असताना ह्या दोन प्रकारांची तुलना करण्याचे...

‘शहरयार’ आणि सुखद योगायोग!

0
ज्‍येष्‍ठ मराठी कवी आणि गझलकार सदानंद डबीर यांनी ‘गारूड गझलचे’ या पुस्‍तकात मराठी गझल व समकालीन उर्दू गझल ह्यांचा तुलनात्मक सौंदर्यवेध घेताना, ‘शहरयार’ ह्या...

कवितेचं नामशेष होत जाणं

कवितेचं नामशेष होत जाणं - काही 'फ्रॅगमेंटेड' कॉमेंटस्   ज्ञानदा देशपांडेचं 'थिंकिंग' आवडलं, बरंचसं पटलंही. त्यांचं एक विधान - 'अरुण कोलटकरांनी अशा मॉडर्निटीला कायम अंतरावर ठेवलं म्हणून...