1 POSTS
रवींद्र रामचंद्र पिंगे हे ललित लेखक होते. ते अर्थशास्त्र विषय घेऊन बी ए झाले होते. त्यांनी मंत्रालयात पंधरा वर्षे नोकरी केली. ते आकाशवाणीच्या मुंबई केंद्रात निर्माता होते. त्यांची पाश्चात्य साहित्याचा परिचय करून देणारी पुस्तके, कथासंग्रह, ‘माणूस’ साप्ताहिकातून प्रसिद्ध झालेले सुमारे दोनशे ललितलेख, ‘सर्वोत्तम रवींद्र पिंगे’, तीनशे भारतीयांची व्यक्तिचित्रे, पाश्चात्य साहित्यसेवकांचे दोनशे परिचय, शंभर प्रवासवर्णने, हजारो पुस्तक परीक्षणे, साठ मानपत्रे, पाच-सहाशे ललित लेख, पन्नास कथा आणि तितकेच अनुवाद ही पिंगे यांची लेखनसंपत्ती आहे.