Home Authors Posts by रविंद्र रुक्मिणी पंढरीनाथ

रविंद्र रुक्मिणी पंढरीनाथ

2 POSTS 0 COMMENTS
रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ हे ‘सर्वंकष’ ह्या वैचारिक त्रैमासिकाचे प्रमुख संपादक आहेत. ते विविध चळवळींशी जोडलेले आहेत. त्यांनी स्त्री-पुरुष समता आणि पुरुषभान ह्या विषयांवर लेखन केले आहे. ते कादंबरी, दीर्घकथासंग्रह, काव्यानुवाद, आरोग्यविषयक लेखसंग्रह, तसेच समकालीन समाज-राजकारण, विज्ञान व गांधी विचार अशा विषयांवर सातत्याने लेखन करतात.

नवा मानुष वाद

एकविसाव्या शतकाने लैंगिकतेच्या उधाणाचे, नातेसंबंधांच्या बाजारीकरणाचे आणि क्षणभंगुरतेचे वादळ आणले आहे, हे खरे आहे. परंतु ते पचवले जाईल आणि स्त्री-पुरुष व अन्य ह्यांनी परस्परांसोबत प्रेम, आदर व जिव्हाळा या भावनेने राहवे, शोषण व नियंत्रण ह्यांपासून मुक्त, निरामय जीवन जगावे ही आस कोणत्याही शतकात कायमच राहील. ‘नवा पुरुष’ समाज आणि साहित्य ह्यांच्या दृष्टिक्षेपात यावा व तो इतका व्यापक व्हावा की त्याचे ‘नवे’पण सार्वजनिक होऊन जावे...

एकविसाव्या शतकातील स्त्री-पुरुष संबंध

जागतिकीकरणाच्या तीन दशकांत झालेल्या अनेक बदलांपैकी सर्वात महत्त्वाचा व मूलभूत बदल भारतीय समाजाच्या लैंगिकताविषयक धारणा व प्रत्यक्ष व्यवहार ह्यांत घडून आला आहे. ह्या परिवर्तनामुळे लैंगिकता व लैंगिक संबंध ह्यांचा पोतच नव्हे, तर आशयदेखील बदलला आहे. जागतिकीकरणानंतर भारतात अनेक पातळ्यांवर परिवर्तन झाले. त्यांपैकी काही बदल उत्पाती व प्रपाती स्वरूपाचे आहेत. त्यांतील मूलभूत स्वरूपाचा, पण सर्वात दुर्लक्षित बदल हा भारतीयांच्या लैंगिकताविषयक जाणिवा, धारणा व व्यवहार ह्यांत झाला आहे. त्या प्रक्रियेची सुरुवात नव्वदच्या दशकात झाली व त्याचे लक्षणीय परिणाम एकविसाव्या शतकात जाणवू लागले. ती प्रक्रिया अजून संपलेली नाही...