2 POSTS
रविंद्र बेडकिहाळ हे महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे अध्यक्ष आहेत. त्या माध्यमातून त्यांनी बाळशास्त्री जांभेकर यांचे मूळ गाव असलेल्या पोंभूर्ले या ठिकाणी स्मारक उभे केले आहे. ती संस्था जांभेकर यांचे कार्य सर्वदूर पोचवण्यासाठी प्रयत्नशील असते. बेडकिहाळ हे शासनाच्या महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे सदस्य आहेत. ते साप्ताहिक ‘लोकजागर’चे संस्थापक आहेत. ते सातारा जिल्ह्यातील फलटण येथे राहतात. त्यांचे ‘आचार्य बाळशास्त्री जांभेकर चरित्र आणि कार्य’ हे पुस्तक प्रसिद्ध झालेले आहे.