8 POSTS
रत्नकला भिमराव बनसोड यांचा जन्म 1961 साली लोणी (तालुका दारव्हा, जिल्हा यवतमाळ) येथे झाला. त्यांनी डी एड आणि समाजशास्त्र विषयातील पदवी पर्यंतचे शिक्षण घेतले आहे. त्यांनी औरंगाबादच्या खोकडपुरा येथील श्री शिवाजी प्राथमिक शाळेत सदतीस वर्षे नोकरी केली. त्या ‘रमाई’ मासिकासाठी नियमित लेखन करतात. त्यांना वाचन, बागकाम आणि जुनी गाणी ऐकण्याचा छंद आहे.