1 POSTS
वैशाली जोशी या डोंबिवलीमध्ये राहतात. त्या एम.ए. पर्यंत शिकल्या आहेत. त्यांनी 'टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस'मधून पौगंडावस्थेतील मुलांसाठीचा समुपदेशनाचा कोर्स केला. त्या विद्यार्थ्यांना मूल्यशिक्षण व शैक्षणिक मार्गदर्शन करतात. वैशाली जोशी यांनी शाळा, कार्यालये, शिबिरे, आकाशवाणी व सामाजिक संस्थांमध्ये विविध विषयांवर साडेचारशेच्या वर व्याख्याने दिली आहेत. त्या टिटवाळा येथील अनाथ मुलींसाठी असलेल्या 'मुक्ता' या प्रकल्पाच्या प्रमुख म्हणून नऊ वर्षे कार्यरत होत्या. त्यांनी डोंबिवली येथे महिलांच्या आत्मभान जागृतीसाठी 'खुले विद्यापीठ' हा प्रकल्प चालवला. वैशाली जोशी यांचे 'वेध उमलत्या विद्यार्थ्यांचा, जाणत्या पालकांचा', 'विचारधारा', 'उत्तम पुत्रप्राप्ती' (संकलनात्मक) इत्यादी साहित्य प्रसिद्ध आहे. याशिवाय, त्यांनी विविध मासिके/नियतकालिकांमधून लेख व स्फुटलेखन केले आहे. त्या कृषी व सहकार विभागातून सेवानिवृत्त झाल्या आहेत.
लेखकाचा दूरध्वनी
992 064 6712