रामकृष्ण चौधरी
पर्वतातील गाव – वसईचे गिरीज !
गिरीज हे पालघर जिल्ह्याच्या वसई तालुक्यातील नयनरम्य ठिकाण. तेथे बऱ्याच टेकड्या पोर्तुगीजपूर्व काळात होत्या. काही उंच, काही ठेंगण्या. त्या सर्व लहानमोठ्या टेकड्यांमध्ये वसलेले गाव म्हणून त्याचे नाव गिरीज. ‘गिरी’ म्हणजे पर्वत आणि ‘ज’ म्हणजे जन्मलेले. पर्वतातील गाव गिरीज ! पोर्तुगीज वसाहतवादी वसईत सुमारे साडेपाचशे वर्षांपूर्वी आले. त्यांनी शेषवंशी क्षत्रिय भंडारी भोंगाळे राज्याची वसई खाडीवरील गढी जिंकली. पोर्तुगीज सोजिरांची नजर आजुबाजूच्या गावांवरही गेली. त्यांतील एक गाव गिरीज...