1 POSTS
रमेशचंद्र धीरे हे उर्दू साहित्याचे व्यासंगी अभ्यासक; तसेच, उर्दू व मराठी भाषांतील अनुवादकही आहेत. त्यांचे मराठीआणि हिंदी भाषांत साहित्य प्रसिद्ध आहे. त्यांचे ‘स्पंदनांचे शब्दवेध’ हा लेखसंग्रह आणि ‘सावली पेटते तेव्हा’ हा कवितासंग्रह प्रकाशित आहेत. ते इंदूरच्या ‘सर्वोत्तम’ या त्रैमासिकात पंधरा वर्षांपासून ‘गझलरंग’ नावाचे सदर लिहीत आहेत. त्यांचे मूळ गाव हिंगणघाट (जिल्हा वर्धा) आहे. त्यांचे हायस्कूलपर्यंतचे शिक्षण तेथेच झाले. ते नोकरीस मध्यप्रदेशमध्ये होते. ते पाटबंधारे विभागात चीफ इंजिनीयरच्या ऑफिसमधून सेवानिवृत्त झाले. ते शहाऐंशी वर्षांचे आहेत.9822922606