Home Authors Posts by रमेशचंद्र धीरे

रमेशचंद्र धीरे

1 POSTS 0 COMMENTS
रमेशचंद्र धीरे हे उर्दू साहित्याचे व्यासंगी अभ्यासक; तसेच, उर्दू व मराठी भाषांतील अनुवादकही आहेत. त्यांचे मराठीआणि हिंदी भाषांत साहित्य प्रसिद्ध आहे. त्यांचे ‘स्पंदनांचे शब्दवेध’ हा लेखसंग्रह आणि ‘सावली पेटते तेव्हा’ हा कवितासंग्रह प्रकाशित आहेत. ते इंदूरच्या ‘सर्वोत्तम’ या त्रैमासिकात पंधरा वर्षांपासून ‘गझलरंग’ नावाचे सदर लिहीत आहेत. त्यांचे मूळ गाव हिंगणघाट (जिल्हा वर्धा) आहे. त्यांचे हायस्कूलपर्यंतचे शिक्षण तेथेच झाले. ते नोकरीस मध्यप्रदेशमध्ये होते. ते पाटबंधारे विभागात चीफ इंजिनीयरच्या ऑफिसमधून सेवानिवृत्त झाले. ते शहाऐंशी वर्षांचे आहेत.9822922606

भीमसेन जोशी – बुलंद आवाजातील करुणासागर (Tribute to Bhimsen Joshi)

ग्वाल्हेर, आग्रा, जयपूर अशा घराण्यांतील किराणा घराण्याचे पांथस्थ म्हणजे भारतरत्न संगीताचार्य स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी हे होत. त्यांचा जन्म कर्नाटकातील धारवाड जिल्ह्यातील रोण या त्यांच्या मावशीच्या गावी 4 फेब्रुवारी 1922 रोजी झाला.