1 POSTS
रमेश जाधव हे सध्या ‘सकाळ अॅग्रोवन’ या वृत्तपत्रात उपवृत्तसंपादक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी कोल्हापूरच्या कृषी महाविद्यालयातून बी एससी इन ॲग्रिकल्चर आणि पुणे विद्यापीठाच्या संज्ञापन व वृत्तपत्रविद्या विभागातून पदव्युत्तर पदवी संपादन केली. त्यांनी रॉयटर्स या आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेच्या रॉयटर्स मार्केट लाईट या कृषीविषयक माहितीसेवेत वृत्तसंपादक म्हणून यापूर्वी काम केले आहे. त्यांनी वसुंधरा इकॉलॉजी अॅन्ड रिसर्च फाउंडेशनच्या ‘सुसंवाद’ या मासिकाचे संपादनही केले आहे. त्यांची पोशिंद्याचे आख्यानः एक प्रश्नोपनिषद’ व ‘शिवार, समाज आणि राजकारण’ अशी दोन पुस्तके प्रकाशित झाली आहेत.9922913192