1 POSTS
राजेश पाटील हे आय ए एस अधिकारी आहेत. त्यांचे कलेक्टर म्हणून पोस्टिंग ओडिशात आहे. ते आयएएस झाले तेव्हा त्यांनी त्यांना झालेला आनंद डोंगरवाटांतून जाताना उंचावरून खेड्यातील आईला पुकारा केला 'ताई, मी कलेक्टर व्हयनू' आणि त्याच शीर्षकाचे त्यांचे पुस्तक 'ग्रंथाली'ने प्रथम प्रसिद्ध केले होते. ते पुस्तक युपीएस/आयपीएस या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थांना प्रेरणादायी ठरले आहे. जळगाव जिल्ह्याच्या खेड्यातील उडाणटप्पू असा मुलगा आय ए एस कसा झाला त्याची कहाणी त्या पुस्तकात ग्रंथित केली आहे. त्यांनी महाअनुभव मासिकामध्ये त्यांचा ओरिसातील अनुभव एका लेखात लिहिला आहे.