राजेंद्र शिंदे
हमीद सय्यद : भारूडांमधून जनजागृतीचा वसा! (Hamid Sayyad- Muslim Divotee Sings Hindu Bhajans)
हमीद सय्यद हे अहिल्यानगर जिल्ह्याच्या शेवगाव तालुक्यातील भातकुडगावचे. छोट्या गावातून आलेला हा मुसलमान मुलगा वयाची चाळिशी ओलांडित असताना राष्ट्रीय भारूडकार होऊन गेला आहे. आकाशवाणी कलावंत तर तो आहेच. तो वारकरी सांप्रदायिक पारंपरिक भारुड सादर करून प्रेक्षकांच्या मनावर चांगलीच हुकूमत गाजवू शकतो. त्याची ती ताकद हेरून त्याचा अनेकविध प्रचारकार्यात उपयोग मुख्यत: केंद्र व राज्य शासनाच्या आणि अन्य संस्थांकडून करून घेतला जातो. हमीद सय्यद यांच्या स्वरचित भारूडांमध्ये गायन, नृत्याभिनय व चटपटीत-उद्बोधक संवाद हे वैशिष्ट्य असते...
गोरक्ष ट्रेकिंग: प्रस्तरारोहकांचे आकर्षण
गोरक्ष किल्ला हा दोन हजार एकशेसदतीस फूट उंचीचा असून तो गिरिदुर्ग प्रकारात मोडतो. तो ठाणे जिल्ह्याच्या कर्जत डोंगररांगेत मोडतो. तो किल्ला ट्रेकर्सच्या दृष्टीने मध्यम समजला जातो. गोरक्ष किल्ला हा मुंबईकरांना आणि पुणेकरांना एका दिवसात करता येण्याजोगा आहे. गोरक्ष आणि मच्छिंद्रगड यांना ऐतिहासिक वारसा नाही तरी त्यांच्या सुळक्यांचे प्रस्तरारोहकांना मात्र आकर्षण वाटते. त्या गडाला महत्त्व शहाजी राजांच्या काळात होते; मात्र तेथे लढाई झाल्याचा उल्लेख नाही. गडाचा उपयोग शिवकालात आसपासच्या प्रदेशावर नजर ठेवण्यासाठी होत असे...
बहामनी राज्य
अब्दुल मुजफ्फर अल्लाद्दिन हसन बहमन शहा हा बहामनी सत्तेचा संस्थापक. त्याने राज्यकारभारास सुरुवात केली 1347 मध्ये. तो हसन गंगू या नावाने इतिहासात प्रसिद्ध आहे....
भैरव
भैरव हा शैव परिवारातील देव आहे. त्याला शिवाचे एक रूप मानतात. भैरव महाराष्ट्रात सामान्यत: ग्रामदेवता म्हणून पूजला जातो. त्याला भैरोबा किंवा बहिरोबा असेही म्हणतात.महाराष्ट्राच्या...
शुल्बसूत्रे
दर्भाच्या विणलेल्या दोरीला शुल्ब म्हणतात. तीन किंवा पाच दर्भमुष्टी घेतात आणि त्या एकापुढे एक अशा प्रकारे वळतात. दर्भदुष्टी व समिधा शुल्बाने बांधतात. पशूच्या अनुष्ठानात...
परंपरा कीर्तनसंस्थेची!
‘मी जर वर्तमानपत्राचा एडिटर झालो नसतो तर नि:संशय कीर्तनकार झालो असतो!’
– लोकमान्य टिळक
कीर्तन ही महाराष्ट्राची एक विशेष सांस्कृतिक परंपरा आहे. कीर्तनसंस्थेचे विशेषत: महाराष्ट्रातील स्थान...
रिपोर्टर अवचट – सुहास कुलकर्णी
रिपोर्टर अवचट - सुहास कुलकर्णी
अनिल अवचट मराठीतील महत्त्वाचे लेखक आहेत. गेली चाळीसहून अधिक वर्ष ते लिहित आहेत. त्यांनी आपल्या लेखनात प्रामुख्याने सामाजिक विषय हाताळलेले...
क्रांतिसिंह नाना पाटील (Krantisinh Nana Patil)
‘प्रति सरकार’वा ‘पत्री सरकार’ हे नाव ज्या व्यक्तीबरोबर जोडले जाते ते क्रांतिसिंह नाना पाटील. ते 3 ऑगस्ट 1900 मध्ये सांगली जिल्ह्यातील ‘येडे मच्छिंद्र’ (बहेबोरगाव) खेड्यात जन्मले. ते तेथेच व्हर्नाक्युलर फायनल ही त्या काळी असणारी मराठी सातवीची परीक्षा उत्तीर्ण झाले. तेव्हा त्यांनी तलाठ्याची नोकरी पत्करली. त्यांच्यावर वारकरी संप्रदायाच्या विचारांचा प्रभाव होता नंतर ते सत्यशोधक चळवळीचे कार्यकर्ते बनले. त्यांनी नोकरी सांभाळत गावोगावी सभा घेऊन समविचारी तरुणांच्या संघटना बांधल्या. ते आपले भाषण रोजच्या व्यवहारातील दाखले, श्रोत्यांच्या मनाला भिडणारी शैली, विनोदाची पेरणी यांच्या आधारावर प्रभावी करत. त्यामुळे ते साहजिकच लोकप्रिय वक्ते झाले...
अहिराणी – खानदेशची मध्यवर्ती बोली
महाराष्ट्राच्या धुळे, जळगाव, नाशिक आणि नंदुरबार या जिल्ह्यांत बोलली जाणारी ‘अहिराणी’ ही एक भारतीय आदिम बोली. तिच्या थोड्या वेगळ्या स्वरूपाला ‘खानदेशी’ असे म्हणतात. मराठीची...
अजिंठ्याचे वैशिष्ट्य – जातककथांचे चित्रांकन
अजिंठा लेणी औरंगाबाद जिल्ह्याच्या सिल्लोड तालुक्यात आहेत. भारतीय पुरातत्त्व खात्याने क्रमांक दिलेली एकूण ‘तीस’ लेणी आहेत. ती सर्व बौद्धधर्मीय आहेत. त्यात ‘विहार’ व ‘चैत्यगृह’ या...








