1 POSTS
राधिका पारसनीस-गुप्ते कल्याणच्या (ठाणे जिल्हा) बिर्ला महाविद्यालयात मराठी विषयाच्या प्राध्यापक आहेत. त्यांनी पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागातून नाथ संप्रदायी शिवदीन केसरी (ज्ञानेश्वरांची योग परंपरा) या विषयावर पीएच डी प्राप्त केली. मार्गदर्शक – कल्याण काळे. त्यांची भारतात विविध ठिकाणी सातशेहून अधिक व्याख्याने/प्रवचने झाली आहेत. त्या गोरखपूर विद्यापीठ आयोजित नाथसंप्रदायी विश्वकोष निर्मिती राष्ट्रीय संमेलनात भारतातील नाथसंप्रदायी संशोधक महिला म्हणून आमंत्रित व्याख्यात्या होत्या. त्यांना मराठीभाषा दिनाच्या दिवशी नाथसंप्रदायावरील संशोधन कार्यासाठी ‘स्त्री-नारी रत्न पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले आहे.75065 50492