Home Authors Posts by प्रमोद सावंत

प्रमोद सावंत

2 POSTS 0 COMMENTS
प्रमोद ज्ञानदेव सावंत यांनी मुंबई विद्यापीठातून संज्ञापन आणि पत्रकारिता विषयाची पदव्युत्तर पदवी संपादन केली आहे. सध्या ते मुंबई विद्यापीठामधून एम ए इन लीडरशिप सायन्स प्रोग्राम या विषयातील पदव्युत्तर पदवीचे अध्ययन करत आहेत. ते व्यवसायाने उद्योजक आहेत. ते युक्ती मीडिया कन्सल्टन्सी या माध्यम समन्वय क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या संस्थेचे संस्थापक संचालक आहेत. ते मुंबई तरुण भारत मध्ये स्तंभलेखन करतात. त्यांचे लेख प्रत्येक शुक्रवारी चौफेर उद्योग नावाने प्रसिद्ध होत असतात. ते विलेपार्ले येथील साठ्ये महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. ते पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांना ‘जनसंपर्काची ओळख’ आणि ‘पत्रकारितेची ओळख’ या विषयासंदर्भातील धडे देतात. त्यांचे ‘दलित उद्योजकांची संघर्षगाथा’ हे पहिले पुस्तक आहे. लेखकाचा दूरध्वनी 8108105232

मंदार भारदे – जिद्दीचा उत्तुंग प्रवास !

मंदार भारदे हा तरुण व्यवसायिक आहे. तो चित्रपटनिर्मिती संस्थांना हवाई चित्रिकरणासाठी चार्टर विमानसेवा देतो. ‘मॅब एव्हिएशन प्रायव्हेट लिमिटेड’ 2012 साली रजिस्टर झाली. त्याने ‘एव्हिएशन वॉर रूम’ ही संकल्पना सार्वत्रिक निवडणुकीच्या वेळी पहिल्यांदा, 2014 साली भारतात आणली. ती राष्ट्रीय स्तरावर नावाजली गेली...

पाईप इंडस्ट्रीजमधील एव्हरेस्ट – नामदेव जगताप (Namdev Jagtap)

अंदाजे 1933 चा काळ. सुपे, सासवड. पुण्यातील एक खेडेगाव. त्या खेडेगावामध्ये अंदाजे तीस-चाळीस घरांचा महारवाडा. त्या महारवाड्यातील जगतापांच्या घरी नामदेवचा जन्म झाला. त्याकाळी अस्पृश्यता...