3 POSTS
प्रल्हाद जाधव हे ललित लेखक आहेत. त्यांची तेरा नाटके आणि नऊ एकांकिका प्रसिद्ध आहेत. त्यांची रानभूल, तांबट, आनंद नक्षत्र, आनंदाची मुळाक्षरे अशी ललित लेखनाची अकरा पुस्तके प्रसिद्ध आहेत. ते राज्य सरकारच्या माहितीखात्यातील संचालकपदावरून आठ वर्षांपूर्वी निवृत्त झाले. ते राहतात माहीमला. ते व त्यांची पत्नी रेखा यांची निसर्गात व गडपर्वतात भटकंती सुरू असते. हिमालयातील भटकंती आणि गिर्यारोहणावर आधारित त्यांचे 'हिमाक्षरे' हे पुस्तकही प्रसिद्ध झाले आहे.