प्रकाश पेठे
अमेरिका – स्थलांतरितांचा देश (America, The Migration Story)
पृथ्वीतलावरील अनेक देशांतील लोक 1840 सालापासून अमेरिकेच्या भूमीवर येऊन थडकत आहेत. कॅलिफोर्निया या अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्यावरील राज्यात सोने सापडल्याची बातमी 1848 च्या सुमारास जगभर पसरली. त्यामुळे सोन्याच्या मोहाने त्यावेळी तीन लाखांपेक्षा जास्त लोक अमेरिकेत येऊन ठेपले. त्या विषयी एक सिनेमाही विसाव्या शतकाच्या मध्यावर निघाला होता. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात युरोपातील अनेकांना त्यांचे त्यांचे देश सोडून पळावे लागले होते. अनेक देशांतील प्रतिभावान आणि मेहेनती तरुण त्या काळात अमेरिकेत दाखल झाल्याने अमेरिका श्रीमंत होण्यास मदत झाली ! किंबहुना तेव्हापासूनच अमेरिकेची धारणा अशी बनत गेली, की जगातील हुशार लोकांनी अमेरिकेत यावे ! आणि त्यांच्या बुद्धिप्रतिभेला व कार्यशक्तीला तेथे वाव होताही...
कॅलिफोर्नियाची उपमा कोकणास का? (Can Kokan area in Maharashtra take clue from California?)
अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यात सोने पावणेदोनशे वर्षांपूर्वी सापडले. कोणीही जावे आणि सोन्याचे पोते घेऊन यावे असा समज सर्वत्र पसरला. सोने मिळते म्हटल्यावर जो तो सोने हाती लागेल या आशेने कॅलिफोर्नियाला जाण्यासाठी धावत सुटला. अमेरिकेतील माणसे आली, चीनमधून बोटी भरून आल्या. त्याला ‘गोल्ड रश’ असे म्हणतात. ‘मॅकेनाज गोल्ड’ नावाचा सिनेमा त्या हकिगतीतूनच निर्माण झाला होता. तेथील स्टॅनफर्ड विद्यापीठातील माजी विद्यार्थ्यांची नावे बघितली तर त्या शिक्षणसंस्थेची थोरवी मनात अधिकच ठसून जाते...
केळशीच्या रमलखुणा
पूर्वीच्या काळी गाव, गावाकडची संस्कृती, गावची अर्थव्यवस्था कशी होती याचे प्रातिनिधिक रूप म्हणजे केळशी. गावाकडचे निसर्गसौंदर्य, तेथील लोकजीवन आणि त्यातील वेगळेपण हे सगळेच भूरळ घालणारे होते. आज गावे शहरीकरणामुळे सुधारली. पूर्वीच्या गावांबाबत अनभिज्ञ असलेल्या आजच्या पिढीला जुन्या गावची सैर केळशी या गावातून घडेल...
केळशी गावचे पारंपरिक खाद्यपदार्थ
महाराष्ट्रात प्रत्येक पट्ट्याची खास खाद्यसंस्कृती आहे. त्यात प्रामुख्याने कोकणी, पुणेरी, मराठवाडी, कोल्हापूरी, खान्देशी, वऱ्हाडी या म्हणता येतील. कोकणात नारळ व तांदूळ मुबलक उपलब्ध असल्यामुळे तेथील पारंपरिक खाद्यपदार्थांत खोबरे व तांदूळ यांपासून बनवलेले पदार्थ जास्त आढळतात...
केळशी देवीचा उत्सव : समाजजीवनाचे प्रतिबिंब
केळशीच्या महालक्ष्मी मंदिराचा उत्सव खूपच मोठा असतो. मंदिर हा पेशवेकालीन वास्तुशिल्पाचा उत्कृष्ट नमुना आहे. उत्सवास केवळ धार्मिक स्वरूप नाही; तर त्यातून केळशी गावाचे समाजजीवन प्रतिबिंबित होते. उत्सव चैत्रशुद्ध अष्टमी ते पौर्णिमा या कालावधीत होतो.
बडोद्यातील विनाशकारी प्लेग, 1896 (KILLER PLAGUE 1896 IN VADODARA)
'थिंक महाराष्ट्र डॉट कॉम' या वेबपोर्टलवर महाराष्ट्र व मराठी माणूस यांबाबतची विविध तऱ्हांची माहिती आपल्याला संकलित करायची आहे. काही ऐतिहासिक महत्त्वाचा डेटादेखील गावोगावाहून, स्थानिक पातळीवरील प्रयत्नांतून उपलब्ध होऊ शकतो.
अख्ख्या भारताचे मोजमाप – द ग्रेट इंडियन आर्क
विज्ञान जगताच्या इतिहासात दोनशे वर्षांपूर्वी भारतात घडलेली घटना म्हणजे लेफ्टनंट कर्नल विल्यम लॅम्बटन (1753-1823) आणि सर जॉर्ज एव्हरेस्ट (1790-1866) यांनी कन्याकुमारीपासून हिमालयापर्यंत, काही अक्षवृत्ते...
यवतमाळचे सर्पमित्र श्याम जोशी
श्याम गोविंदराव जोशी म्हणजे यवतमाळमधील विशेष व्यक्ती आहेत. ते वयाच्या चौदाव्या वर्षांपासून सेहेचाळीस वर्षें सर्पांच्या राज्यात रमून गेले आहेत. जिल्ह्यात कोठेही साप निघाला तर...
गणदेवी (गुजरात) – राम गणेश गडकरी यांचे जन्मगाव
मी नवसारीला 2013 साली गेलो होतो. गांधीजींनी मिठाचा सत्याग्रह जेथे केला त्या दांडीला जाण्यासाठी. राम गणेश गडकरी यांचा जन्म नवसारी तालुक्यात झाला होता हे...
गुजरातमधील कुटुंबसंस्था आणि कुटुंबकबिला हरवला!
मी ‘आर्किटेक्चर’चे काही विषय गुजराथमधील तीन महाविद्यालयांत व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून शिकवतो. मला तेथे पाच-सात मुले तरी दरवर्षी ‘सर, आय अॅम अ सिंगल चाईल्ड’ असे सांगणारी भेटतात....