1 POSTS
प्रकाश वसंतराव मुनशी हे सेवानिवृत्त शिक्षक आहेत. त्यांना तेल्हारा तालुका शिक्षक गौरव समितीतर्फे उत्कृष्ट शिक्षक या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांचा विविध विषयांवरील चर्चासत्र व व्याख्यानमालांत सहभाग होता. त्यांचा राजकीय, सामाजिक, पौराणिक, ऐतिहासिक व भौगोलिक या विषयांचा अभ्यास आहे. त्यांनी मराठी नाटकांमधून अभिनय व दिग्दर्शनही केले आहे. त्यांची 'आमची दत्तधाम यात्रा' व 'आमची नर्मदा परिक्रमा' ही पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. ते नागपूरला वास्तव्यास असतात.