1 POSTS
प्रज्ञा पवार या लेखिका आणि कवयित्री आहेत. त्या 'परिवर्तनाचा वाटसरू' या पाक्षिकाच्या संपादक आहेत. त्या 'सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालय, ठाणे' येथे मराठी विभागप्रमुख म्हणून कार्यरत आहेत. त्यांचे 'अंत:स्थ', 'उत्कट जीवघेण्या धगीवर', 'मी भिडवू पाहतेय समग्राशी डोळा' हे कवितासंग्रह, 'अफवा खरी ठरावी म्हणून' हा कथासंग्रह, 'धादांत खैरलांजी' नाटक असे अनेकविध विषयांवरील साहित्य प्रकाशित झाले आहेत. त्यांना 'कवयित्री शांता शेळके पुरस्कार', 'बिरसा मुंडा राष्ट्रीय पुरस्कार', 'माता भीमाबाई आंबेडकर पुरस्कार' असे पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
लेखकाचा दूरध्वनी
9869480141
न्यायालयांची भूमिका ‘दलित’ या शब्दाऐवजी ‘अनुसूचित जाती’ असा उल्लेख शासकीय कागदपत्रांमध्ये करावा अशी आहे. ती प्रशासन चालवण्याच्या दृष्टीने समजण्यासारखी आहे. न्यायालयाने म्हटले आहे, की ‘दलित’ या शब्दातून ‘शोषित’, ‘पीडित’, ‘दडपलेले’ असे अर्थ व्यक्त होतात, त्यामुळे तो शब्द अपमानजनक आहे, समूहाच्या दुर्बलतेकडे, दुय्यमत्वाकडे इशारा करणारा आहे. न्यायालयाचे प्रतिपादन वर वर पाहता रास्त वाटते; पण केंद्र व राज्य सरकारे जेव्हा केवळ शासकीय व्यवहारातून नव्हे तर, एकूणच, समाजाच्या सार्वजनिक पटलावरून ‘दलित’ हा शब्द गायब करण्याचे धोरण अहमहमिकेने राबवू पाहताना दिसतात...